मान्यवर
रोजगार हमी योजना, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन
रोजगार हमी योजना, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन यांचे व्दारे रोजगार हमी योजना कायदा 1977 (6 ऑगस्ट 2014 मध्ये झालेल्या सुधारणेसह) व कलम (12) (ई) मधील तरतुदीनुसार वैयक्तिक लाभाच्या योजनांसह महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र यांचे माध्यामातुन रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे.
रोजगार हमी योजना तळागाळातील वंचित घटकांसाठी, लोक-केंद्रित, मागणी-प्रधान, कामाची निवड करण्याचे स्वातंत्र्य आणि रोजगाराचा हक्क, म्हणून तयार केलेली आहे. ही योजना उत्पादक मालमत्तेची निर्मिती, पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन, समाजातील उपेक्षित घटकांना, विशेषत: अनुसूचित जाती/जमाती आणि ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण, ग्रामीण-ते-शहरी स्थलांतर कमी करणे, सामाजिक समता वाढवणे, आणि ग्रामीण स्वशासन बळकट करण्यासाठी संधी प्रदान करते. राज्याच्या ग्रामीण भागात विकेंद्रीकरण आणि पारदर्शकता आणि जबाबदारीची प्रक्रिया इ.
